सावधान हे कराल तर कर्करोगास द्याल आमंत्रण ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Monday, June 1, 2020

सावधान हे कराल तर कर्करोगास द्याल आमंत्रण ?



सावधान... हे कराल तर कर्करोगास द्याल आमंत्रण ?     
     तर मित्रांनो आज आपण एक अशा विषयांवर बोलणार आहोत ज्यामुळे लाखो लोक या व्यसनामुळे मरत आहेत. हे माहित असतांना सुध्दा लोक त्याच सेवन करतात आणि कर्करोग  जे की सर्वात घातक आजार आहे त्याला निमंत्रण देतात. आज याविषयांवर बोलण्याचे कारण म्हणजे काही दिवसापुर्वी 31 मे रोजी जागतिक तंबाखु विरोधी दिन होता.  
    संपुर्ण जगामध्ये तंबाखु विरोधी दिन पाळला जातो व लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली जाते.  मित्रांनो तंबाखु किंवा तंबाखुजन्य पदार्थाच व्यसन केल्यामुळे तोंडाचे कर्करोग होते. बिडी, सिगारेट च्या व्यसनामुळे   फुफुसची कार्य करण्याची क्षमता कमी होते. तरी पण आज कित्येक लोक या व्यसनाकडे आकर्षित होतांना दिसत आहे. सर्वांना माहितच आहे की, सिगारेटच्या पॉकेट, तंबाखुच्या पुडीवर, बीडीच्या पॉकेटवर लिहीलेल असते Smoking Injures To Health ,  हे कर्करोगास कारणीभुत आहे तरी पण ते वाचतात पण सिगारेट, बिडी, तंबाखु सोडत नाही. 
       तर आपण काही आकडेवारी माहिती पाहुया GATS 2016-17 च्या सर्व्हेनुसार जगातील  42.4% पुरूष व 14.2  महिलांना तंबाखू चे व्यसन आहे. तसेच 28.2 %  प्रौढ व्यक्ती सध्या तंबाखू चे व्यसन करतात म्हणजे जवळजवळ जगातील 266.8 मिलियन इतके लोक आहे. आता भारतामध्ये  28.6 इतके लोकांना तंबाखू व तंबाखुजन्य (बिडी, सिगारेट) पदार्थाच व्यसन आहेयामध्ये महिलांचा  सुध्दा समावेश आहे. मेट्रो सिटी मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही धुम्रपान करतांना दिसुन येतात.
        तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थच्या व्यसनामुळे दर 8 सेकंदाला 1 व्यक्तीचा मृत्यू होत आहे.  हे खुप गंभीर बाब आहे. त्यामुळे आपण आणि आपल्याला कुुटुंबाला   व्यसनापासून लांब ठेवलं पाहिजे. धूम्रपान  हे त्या व्यक्तिलाच नव्हे तर तो ज्या परीसरात धुम्रपान करत असतो, तेथील हवा प्रदुषित करतो, त्या परीसरात उपस्थित सर्व व्यक्तिंना सुद्धा हानिकारक आहे
     मित्रांनो एक विचार करा, जर तुम्हांला डॉक्टर ने सांगितले की, तुम्हांला कर्करोग झाला आहे हे ऐकुन कस वाटेल मला माहित आहे खुप वाईट वाटेल, रडु सुध्दा येईल, पण तुमच्या नंतर सगळयात जास्त त्रास कोणाला होणार तर तुमच्या कुटुंबाला  एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो  व्यसन  संपुर्ण कुटुंबाला उध्दवस्त करतो (मुल, बायको, आई-वडील) त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाला नेहमी व्यसनापासुन लांब ठेवल पाहिजे
तंबाखु व धुम्रपान, बिडी इत्यादीचे चे व्यसन लागते कसे ?
1.   1.कुटुंबामध्ये कोणी जर करत असतील त्यांच अनुकरणाव्दारे.
2.   2.वाईट मित्रांच्या संगतीत राहुन.
3.   3.टि.व्ही वर जाहिरात, चित्रपट पाहुन.
4.   4.चुकीच्या माहितीमुळे- जसे, काही मित्र म्हणतात सिगारेट पिल्याने डोकदुखी कमी होते, अभ्यासात मन लागत, टेंशन कमी होते  इ.
तंबाखु व धुम्रपान, बिडीचे इत्यादीचे दुष्पपरिणाम-
1.   1. रोगरोग प्रतिकार शक्ति कमी होते. 
2.     2.तोंडाचे किंवा फुफुसाचे कर्करोग होते.
3.     3.श्वसानाचे आजार होता.
4.     4.मानसिक संतुलन बिघडते.
5.     5.एकाग्रता नष्ट होत जाते.
6.     6.किडनीचे विकार, दंत रोग, आतड्याचे रोग होतात.
7.     7.कौटुबिक वाद होतात.


व्यसनापासुन लांब कस राहयच किंवा सोडायच कस ?
  1. 1.    रोज आपल्या जीवनामध्ये व्यायाम, योगासन, ध्यान इत्यादी चा आणि सकस (फळे, भाज्या) आहाराचा  समावेश करावा ज्यामुळे आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य सदृढ राहते व आपली रोग प्रतिकार शक्ति सुध्दा वाढते. रोज सकाळी योग व ध्यान केल्यामुळे आपल्याला नकारात्मक विचार येत नाही आपण नेहमी सकारात्मक राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कोणतेही व्यसन आपल्या कुटुंबापेक्षा मोठ नाही.
  2. 2.    शपथ घ्यायची की कोणत्याही परीस्थितीमध्ये आपण व्यसन करणार नाही. मी माझ्या कुटुंबाला त्रास देणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा.
  3. 3.     ज्यां लोकांना  व्यसन सोडायचे असेल त्यांनी सर्व प्रथम डॉक्टरला  भेटावे त्यानंतर त्यांनी दिलेल्या सल्यानुसार अंमलबजावणी करावी.
  4. 4.    जवळ-जवळ 2 ते 3 वर्षात आपले आरोग्य व्यसन नसलेल्या व्यक्तिप्रमाणे होते.
  5. 5.    मी खुप जणांकडुन ऐकलय की, धुम्रपान केल्याने टेंशन कमी होत, पण एक लक्षात घ्या  मित्रांनो की जर अस असत तर सर्व जग व्यसनी बनल असत कारण आज प्रत्येकाला टेंशन आहे. त्यामुळे अशा फालतु अफवेला बळी पडु नका.
  6. 6    पालकांना एक सल्ला आहे की, आपल्या मुलांवर लक्ष ठेवा ते काय करतात,कुठे जातात,  पैसे कीती खर्च करतात यामुळे सुध्दा व्यसनाला बळी जाणार नाही.
  7. 7जीवन खुप सुंदर आहे त्याचा आनंद घ्या जगामध्ये किती गोष्टी आहेत ज्याचा आनंद आपण घेऊ शकतो. संपुर्ण जगामध्ये फिरण्यासाठी बघण्यासाठी खुप जागा आहेत. त्या बघा, आपल्या कुटुंबासोबत  वेळ घाला व आनंदी रहा.


तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती  दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट करा आणि नक्की मित्रांना सांगा. 
मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..




     


No comments:

Post a Comment