MPSC करतांना इतिहास विषयासाठी काणते पुस्तके वापरावी ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Monday, June 8, 2020

MPSC करतांना इतिहास विषयासाठी काणते पुस्तके वापरावी ?

MPSC करतांना  इतिहास विषयासाठी काणते पुस्तके वापरावी .?

          मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना इतिहास या विषयासाठी कोणती पुस्तके वापरावे याबाबत माहिती घेणार आहोत. नवीन विद्यार्थी मित्र  असतील ज्यांनी Mpsc  ची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा निर्णय घेतला असेल पण त्यांना सर्वात पहिला प्रश्न असेल की, संदर्भग्रंथ कोणते खरेदी करावे ? तर आपण आज फक्त इतिहासाबाबत बोलणार आहोत. इतिहास विषयाचे बाजारात वेगवेगळ्या प्रकाशनाचे पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे नेमके कोणते पुस्तक वापरावे याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. तर आज आपण काही प्रसिद्ध सर्वात जास्त विक्री होणाऱ्या पुस्तकांची माहिती येथे घेणार आहोत जे की, राज्यसेवा, गट-ब, गट-क इत्यादी परीक्षेला तुम्हांला अत्यंत उपयोगी पडणार आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना आपण त्याचे काही भाग करू ज्यामुळे आपल्याला पुस्तकांचा क्रम लक्षात येईल.
1. प्राचीन  व मध्यगीन इतिहास
      तर मित्रांनो आपण जर एमपीएस्सी राज्यसेवा या परीक्षेची तयारी करत असाल आणि विचार करत असाल की, प्राचीन व मध्ययुगीन इतिहाससाठी कोणते पुस्तक वापरावे. तर मी तुम्हांला 3 प्रकाशनचे पुस्तकांचे नांव सुचवेल त्यापैकी आपण कोणते पण एक पुस्तक  घेऊन तुमचा प्राचिन व मध्ययुगीन भारतीचा इतिहास या विषयाचा चांगला अभ्यास होईल.
नांव
प्रकाशनाचे नांव
लेखक

प्राचिन व मध्ययुगीन भारताचा इतिहास
ज्ञानदिप प्रकाशन
संजय बिरादार सर



प्राचिन व मध्ययुगीन भारताचा इतिहास
युनिक ॲकडमी
श्रीकांत जाधव सर


प्राचिन व मध्ययुगीन भारताचा इतिहास
ज्ञानज्योती प्रकाश
मनोज पवार


2. आधुनिक  भारताचा इतिहास
     आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक आपल्याला राज्यसेवा, गट-ब, आणि गट-क या तिन्ही परीक्षेला उपयोगी पडणार आहे. त्यासाठी सर्वात प्रसिध्द प्रकाशन व जास्त विक्री होणारे काही पुस्तके खालील प्रमाणे आहे
नांव
प्रकाशनाचे नांव
लेखक

आधुनिक भारताचा इतिहास
भगीरथ प्रकाशन
रंजन कोळंबे सर


आधुनिक भारताचा इतिहास
एस.चन्द
ग्रोव्हर आणि बेल्हेकर


Indias Struggle for Independence

के सागर
मुळलेखक-बीपीन चंद्र


3आधुनिक महाराष्ट्रचा इतिहास
     महाराष्ट्राचा इतिहास सुध्दा परीक्षे मध्ये खुप महत्वाचा आहे. जे विद्यार्थी गट-ब, गट-क करत असतील त्यांना महाराष्ट्राचा इतिहास या विषयाचा जास्त अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्राचा इतिहास या विषयासाठी सध्या बाजारात प्रसिध्द व सर्वाता जास्त विकली जाणारी पुस्तक आहे खालील प्रमाणे आहे.
नांव
प्रकाशनाचे नांव
लेखक

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
कल्पना प्रकाशन
डॉ. अनिल कठारे सर


आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

डॉ.एस.गाठाळ सर


आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास
के सागर
प्रा.व्हि.बी.पाटील सर


      तर विद्यार्थ्यानों वरील पैकी आपल्याला कोणते पण 1 प्रकाशनाचे एकच पुस्तक वापरायचे आहे. 10 पुस्तके वाचण्यापेक्षा तुम्ही वरीलपैकी 1 प्रकाशनाचे एकच पुस्तक वारंवार वाचा तुम्हांला यश नक्की मिळेल. 
     पुस्तक वाचतांना अभ्यासक्रमानुसार टॉपीक वाचा, ज्या टॉपीकला जास्तक मार्क आहे त्या टॉपीकला जास्त वेळ द्या अभ्यास करत रहा. 
ALL THE BEST ….
तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती  दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट करा आणि नक्की मित्रांना सांगा. 
मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..

No comments:

Post a Comment