वाचनाची सवय कशी लावावी ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Sunday, May 24, 2020

वाचनाची सवय कशी लावावी ?

वाचनाची सवयकशी लावावी?


सर्वांना माझा नमस्कार, तर मित्रांनो आज आपण वाचनाची सवय कशी लावावी या बाबत थोडक्यात अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम वाचन करतांना हे की,  वाचनाचा उद्देश हा माहिती अथवा ज्ञान मिळवने हा निश्चय करणे. 
वाचन करताना स्वतःला सांगायचंय की आपण जे वाचतो आहे ते फक्त धडा किंवा पुस्तक संपवण्यासाठी नसून ते  संकल्पना समजवुन घेऊन ज्ञान मिळवण्यासाठी करत आहोत ते लक्षात ठेवायच आहे. मी पाहिलय काही विद्यार्थ्यांना पाहिल की फक्त विषयाच नावं घेतल की म्हणतात तोह विषय खुप अवघड आहे ते मला जमत नाही इत्यादी सर्वप्रथम ही गोष्ट डोक्यातुन काढून  टाका. 
मित्रांनो एक साध उदाहरण देतो, सुरुवातीला ज्यावेळेस आपण सायकल शिकतो त्यावेळेस किती वेळेस खाली पडतो व कित्येक वेळेस पायला, हाताला, गुघ्याला इ. ठिकाणी मार लागतो. पण आपला निर्णय ठाम असतो की आपल्याला सायकल शिकायची म्हणजे शिकायचीच.नंतर मग मोटोरसायकल नंतर पुढे कार अस शिकत जातो.  तसच वाचनाच सुद्धा असत. 
मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला वाचनाची दररोज सवय लावायची असेल तर सुरुवातीला छोट्या पुस्तकापासून सुरु करा आणि कमी वेळे पासून करा काही विद्यार्थी मी पाहिले सुरुवातीला एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगितले इतके पुस्तके वाचून, इतके तास वाचून मी अधिकारी झालो मग काय पहिल्याच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत 500 पानाच पुस्तक घेऊन वाचत असतात पण काही दिवसांनी 100 पानावरतीच थांबतात  अस करू नका विद्यार्थी मित्रांनो, सवय ही हळू हळू लागत असते वाचनाची सवय सुद्धा हळू हळू वाढवा सुरुवाती 1 तास 100 पानांच सोपे शब्द असेलेल जसे गोष्टींच किंवा समाजसुधारकाच पुस्तक (काही पुस्तक खाली देत आहे) घेऊन वाचा नंतर 200 नंतर वेळ वाढवा अस करत करत तुम्हाला वाचनाची सवय पण लागेल  नियमितता पण निर्माण होईल.
       एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस आपण कोणत पण नवीन ज्ञान घेण्याचे प्रयत्न करतो त्यावेळेस मेंदु सुरुवातीला स्वीकारत नाही कारण त्याची ओळख नसते तो अनोळखी असल्याने तो प्रतिसाद कमी देतो म्हणजे काय तर डोकं दुखणं, डोळ्यांत पाणी येणे, एकाग्रता न होणे इ. होते (उदा.सायकल शिकणे). त्यामुळे शब्दांची किंवा नवीन ज्ञानाची ओळख करून द्या हळू हळू मेंदू ते ज्ञान स्वीकारत जातो व तुम्हाला सवय होते. नंतर तुम्ही    8 ते 10 तासापर्यंत सहज वाचन करु शकाल त्यामुळे प्रयत्न करत रहा रोज थांबू नका .....

तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती  दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर नक्की मित्रांना सांगा.
मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..



Read Best Books



No comments:

Post a Comment