विद्यार्थी आणि आरोग्य.. - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Sunday, May 17, 2020

विद्यार्थी आणि आरोग्य..

विद्यार्थी आणि आरोग्य


         आज आपण मित्रानों विद्यार्थी आणि आरोग्य याबाबत मंथन करणार आहोत. आज विद्यार्थ्यांच्या जीवनात अनावश्यक व आवश्यक गोष्टींची तसेच वस्तूंची भरमसाठ वाढ झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर व त्यांच्या आरोग्यावर चांगला व वाईट दोन्ही परिणाम दिसून येत आहे. जसे मोबाइल, टीव्ही, संगणक इत्यादी वापरामुळे एकीकडे विद्यार्थ्यांची प्रगती  होत आहेत तर त्यांच्या अति वापरामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम सुद्धा होत आहेत.
आरोग्य हे दोन प्रकारचे आहे असते 
1. शारीरिक आरोग्य
2. मानसिक आरोग्य
        मोबाइल, टीव्ही, संगणक इत्यादी अति वापरामुळे  शारीरिक आणि मानसिक  दोन्ही आरोग्यावर हानिकारक असा परिणाम होतो. पण काही जण म्हणतील सर आवश्यक आहे काही मुलांनी आता ऑनलाईन क्लासेस सुद्धा लावले आहे व काहीजण ऍप द्वारे सुध्दा अभ्यास करत आहे. त्यामुळे आता आपल्याला जास्त सदृढ राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या जास्त कष्ट करावे लागेल. 
        जर आपण दररोजच्या वेळातून काही वेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी द्यावे लागेल तरच आपण आळस,गंभीर आजारापासून सुरक्षित राहू शकतोत व मानसिकरित्या सक्षम बनू शकतोत..  आपल्याला काही खलील गोष्टी आपल्या जीवनामध्ये समावेश करणे अनिवार्य झाले आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही.
1. दररोज लवकर उठणे आणि लवकर झोपणे 
मराठीत एक म्हण आहे ," लवकर निजे लवकर उठे त्यास मिळे, धन ,आरोग्य ,संपत्ती ," त्यामुळे रोज सकाळी उठून अभ्यास केल्यावर जास्त फायदा होतो आणि आरोग्य पण सदृढ राहते रात्री पण लवकर आणि वेळेवर झोपावे.
2. दररोज 30 मिनिट व्यायाम - दररोज नियमित व्यायाम केल्याने शारीर सदृढ होते व आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते व आपण आजारी पडत नाही आता तुम्ही म्हणाल सर व्यायाम करणे म्हणजे जीम मध्ये जाणे खूप शारीरिक कष्ट करणे ते आम्हाला जमत नाही तर मित्रांनो काही व्यायाम असे आहेत जे खूप सोपे अन सहज करू शकतात उदा. वेगाने चालणे , सायकल चालवणे, जॉगिंग करणे इ.
4. 30 मिनिट योगा आणि ध्यान करणे- तर मित्रांनो शरीरासाठी व्यायाम जितका गरजेचं  शारीरिक विकास करण्यासाठी तितकच गरजेचं योगा व ध्यान करणे मानसिक विकासासाठी पण गरजेचं आहे. रोज सकाळी जर 20 मिनिट योगा आणि 10 ध्यान जर केला तर आपल मन शांत राहत तसे अभ्यासामध्ये सुद्धा एकाग्रता वाढते.
5. सकाळी अंकुरित कढधान्य सेवन करणे-सकाळी जर अंकुरीत काढधान्य  मटकी, वाटणे, हरभरे, शेंगदाणे रात्री भिजवून सकाळी खाल्ले तर आपल्याला त्यामधून अपल्या शरीराला खूप ऊर्जा मिळते.
6. फळे आणि भाज्यांचे सेवन करणे- आपण आपल्या आहारामध्ये ताजे फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवले पाहिजे. त्यांच नियमित सेवन केल पाहिजे त्यामुळे आपल्याला डोळे ,त्वचा, पोटाचे विकार होण्याचे  प्रमाण कमी होईल. 
7. संतुलित व योग्य आहार घेणे - तर मित्रांनो आज सगळीकडे फक्त कमी वेळेत तयार होणारे पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे(फास्टफूड) ते आपण टाळले पाहिजे. पोटाला हलक अस व कमी मिरची, मसालेदार आणि तेलकट असलेल आहार आपण घेतले पाहिजे.
8. व्यसनापासून लांब राहणे- आज व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, तरुण पिढी जास्त आकर्षित होताना दिसत आहेत पण व्यसनामुळे कर्करोग सारखा आजार होतो हे तर माहीत आहेच पण  शरीरच  नव्हे तर मानसिक आरोग्य पण बिघडवते ज्यामुळे अभ्यास करताना अडचण निर्माण करते. त्यामुळे व्यसनापासून प्रत्येक व्यक्तीने लांब राहणे खूप गरजेचं आहे .
तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर नक्की मित्रांना सांगा.मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..
धन्यवाद..


 
Read Best Books Read Best Books

No comments:

Post a Comment