कोरोनासोबत जीवन जगण्यासाठी काही उपाय? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Thursday, May 14, 2020

कोरोनासोबत जीवन जगण्यासाठी काही उपाय?

कोरोनासोबत जीवन जगण्यासाठी काही उपाय?


मित्रांनो सर्व जग कोरोना महामारीशी लढत आहे. कोरोनवर लस शोधण्यासाठी सर्व जग युध्द पातळीवर काम सुरू आहे पण जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत  आपल्यालाच म्हणजे प्रत्येक नागरिकाला या आजाराशी लढा द्याचा आहे.  तर आज आपण कोरोना आजार आपल्याला होऊ नये म्हणून काही खबरदारीचे उपाय आपल्या जीवनात सवय म्हणून सूरु करायचे आहेत आणि खूप सोपे उपाय आहे पण नियमित जर तुम्ही त्याची सवय लावली तर ते नक्कीच आपल्याला कोरोना आणि इतर जिवाणू पासून सुरक्षित ठेऊ शकतात. तर उपाय किंवा सवय खालील प्रमाणे आहेत .
1. हात धुण्याची सवय 
जेवणा आधी, बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ किमान 20 सेकंदपर्यंत  धुवून घ्यावे. तसेच जर शक्य असेल तर  आपण ऑफिस मधून घरी आल्यानंतर  गरम पाण्याने अंघोळ करून घ्यावे.

2. बाहेर जाताना मास्कचा नियमित वापर करणे
घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लाऊन घ्यावे तसेच बाहेरून आल्यावर ते कपड्याचा मास्क गरम पाण्यात धुण्यास टाकावे.

3. सकाळी गरम अथवा कोमट पाणी पिण्याची सवय
तज्ञ सांगतात सकाळी गरम अथवा कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील खूप आजार कमी होतात अथवा होतच नाहित तसेच शरीर निरोगी राहते, तसेच वजन कमी करण्यास मदत होते 


4. फळे भाज्या  धुण्याची सवय
फळे भाज्या आता जास्त काळजीपूर्वक धुऊन घ्यावे लागेल. बाहेरून फळे,भाज्या आणल्यावर पातेल्यात पाणी व थोडे मीठ टाकून गरम करून घ्यावे व त्यानंतर त्यामध्ये फळे व हळूहळू फाज्या धुऊन घ्यावे व नंतर त्यांचा वापर करावा.

5.हँडवॉश/सॅनिटीझर/साबण  वापरण्याची सवय
आता आपल्याला सॅनिटीझर व हँडवॉश नियमित आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करावा लागेल जर सॅनिटीझर, हँडवॉश नसेल तर घरात जो साबण असेल त्यांनी आपले हात त्यांनी धुण्याचा सवय लावायची आहे.

6. दररोज 30 मिनिटे व्यायाम, योग करण्याची सवय
कोरोना आजार आल्यापासून लोकांना आता व्यायाम व योगासन याचे महत्व कळालेच आहे.तर आता आपल्याला शांत बसून राहून जमणार नाही तर रोज आपल्याला किमान 30 मिनटं रोज नियमित करावेच लागणार आहे. व्यायाम व योगासन यामुळे आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ राहते व नकारात्मक विचारापासून लांब राहतो.

7. शारीरिक अंतर ठेवण्याची सवय
आता आपले जीवन अगोदर सारख राहणार नाही की कोणाला हात मिळवले आणि मिठी मारली तर आपल्याला नमस्ते च वापर करायचा आहे आणि 2 मीटर अंतर पुढच्या व्यक्तीमध्ये व आपल्यामध्ये असले पाहिजे.

8.सार्वजनिक वस्तुंना स्पर्श करणे  टाळावे
तर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की  आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जाल तेव्हा तेथील वस्तुंना स्पर्श करण्याचे टाळावे जसे पायऱ्या जवळ स्टील रॉड, गेट, दरवाझे इत्यादी

9. वेळोवेळी  शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे

10. गर्दीच्या च्या ठिकाणी जाणे टाळावे

तर मित्रांनो वरील काही उपाय / नियम / सवय इत्यादीं मुळे आपण कोरोना आजारापासून सुरक्षित राहू शकतो तसेच अत्यावश्यक  कारण नसेल तर बाहेर  घराबाहेर निघू नये .
लवकरच कोरोनावर लस मिळावे हीच देवाकडे प्रार्थना.............


No comments:

Post a Comment