वेळेचा सदुपयोग कसा करावा ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Friday, May 22, 2020

वेळेचा सदुपयोग कसा करावा ?

Add caption

वेळेचा सुदुपयोग कसा करावा?


जर आपल्याकडे वेळ असेल किंवा सुट्टी असेल आणि त्याचा उपयोग कसा करावा याबाबत विचार करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी आहे.

1.आवडते पुस्तक वाचून- जसे व्यायाम केल्याने शरीर सदृढ राहते तसेच चांगल्या पुस्तकांचे वाचन केल्याने मेंदू सदृढ राहते व आपल्या मेंदूत सकारात्मक विचार निर्माण होतात. जगातील सर्वाधिक  श्रीमंत लोकांना सुद्धा पुस्तक वाचण्याची सवय असते आणि ज्यावेळेस पण त्यांना वेळ मिळते ते सुद्धा पुस्तक वाचतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीचे पुस्तक वाचून वेळ घालवू शकता आणि ही एक खूप चांगली सवय आहे ज्यामुळे तुमच्या ज्ञानात आणि चांगल्या विचारात भर पडते
2. नवीन भाषा शिकणे- तुमच्या जवळ असलेल्या वेळेचा उपयोग तुम्ही एखादी भाषा शिकण्यासाठी करू शकता.उदा. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इ. आज तंत्रज्ञानाच्या युगात घरी बसून कोणती भाषा शिकू शकतो. 
3. सायकल /मोटरसायकल/ कार शिकणे- तुम्हाला जर वाहन चालवता येत नाही ते शिकण्यात वेळ घालवू शकता. जसे लोकांना सायकल/मोटारसायकल/कार इ. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये  त्याचा उपयोग करु शकता.
5. आई-वडील , कुटुंबासोबत वेळ घालवून- मित्रांनो आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे धावपळीचे युग आहे त्यामुळे लोकांकडे आई-वडील किंवा कुटुंबाला बोलण्यासाठी त्यांची माहिती घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही. पण लोकांना हे कळत नाही गेलेली वेळ कधी परत येत नाही आणि नंतर वेळ गेल्यावर होतो तो फक्त पश्चताप.त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला महत्व द्या ते लहान असो की मोठे त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू हे कळत आणि काही अनर्थ होणार असेल तर ते टळत आणि कुटुंबासोबतच  आपला नात घट्ट आणि प्रेमळ होत. तसेच भविष्यात होणारे वाद , भांडण इ. होत नाही.
6.ऑनलाईन कोर्स -ऑनलाईन कोर्स एक वेळेची गुंतवणूक आहे तुम्हाला सगळ्यात जास्त फायदेरशिर ठरते घरात बसून ऑनलाईन कोर्स शिकू शकता. यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती करू शकता.जसे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्से, कॉम्प्युटर कोर्सेस इ. ज्यामुळे तुम्ही आणखी स्मार्ट होऊ शकता.गूगल वर यु-ट्यूब वर सर्च करा तुम्हाला जे  कोर्स करायचे आणि आवडते कोर्स निवडून प्रवेश घ्या.
7.आवडीच्या स्थळांना भेट- आता काही लोकांना सर्वात जास्त आवडत नवीन  स्थळांना भेट देऊन त्या स्थळांचा अभ्यास करणे तेथील पर्यावरणाचा आनंद घेणे,एकांतात बसून राहणे इ.आता नवीन स्थळ म्हणजे काही पण असून शकत जसे किल्ला, डोंगर, मंदिर, शेत, इ. ठिकाणी जे वातावरण आपल्या मनाला एक प्रकारे शांत ठेवत आणि ताण-तणाव कमी करण्यास मदत करतो असे ठिकाण होय. त्यामुळे आवडीच्या स्थळांना भेट देऊन वेळ घालवू शकतो.
8.पुस्तक ,लेख लिहणे.   - जर तुम्हाला लेखन करणे आवडत असेल आणि तुम्हाला एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान असेल तर तुम्ही त्या विषयावर एखादे पुस्तक किंवा लेख सुध्दा लिहू शकता आणि जर आपले लेखन खूप प्रभावशाली असेल तर भविष्यात तुम्हाला एक लेखक म्हणून सुध्दा प्रसिद्धी मिळू शकते. आज लेखन करून लोक प्रसिध्द होत आहेत इतकच नव्हे मोठं-मोठे अभिनेते सुध्दा  वेळ मिळाल्यावर स्वतःच आत्मचरित्र लिहून लेखनाचा छंद जोपासत आहेत.
तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर नक्की मित्रांना सांगा.
मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..


Read Best BookRead Best Book

धन्यवाद..



No comments:

Post a Comment