Mpsc चा अभ्यास कसा करावा ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Friday, May 29, 2020

Mpsc चा अभ्यास कसा करावा ?


Mpsc/Upsc चा अभ्यास कसा करावा ?


        सर्व मित्रांना माझा नमस्कार, तर आज  आपण MPSC व इतर स्पर्धा परीक्षा यांचा अभ्यास कसा करायचा याबाबत थोडक्यात अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो अभ्यास कसा करावा ? किती तास करावा ? ज्यामुळे आपल्याला अधिकारी होता येईल व आपले स्वप्न पुर्ण करता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो MPSC व स्पर्धा परीक्षामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायच असेल तर प्रामाणिक अभ्यासक करावा लागेल,  नियमित अभ्यास करावा लागेल संयम  ठेवावा लागेल. जो विद्यार्थी हे करतो तोच या MPSC व स्पर्धा परिक्षामध्ये यशस्वी होतो. 
     एक म्हण आहे – “ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे”  जर तुम्ही  कोणतीही गोष्ट मनापासुन करण्याचा निश्चिय केला तर तुम्हाला ती गोष्ट करण्यापासुन कोणीच थांबवू शकत नाही. या जगामध्य कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्ही निश्चिय केलाच की, मी अभ्यास करणार आणि मी अधिकारी होणारच तर तुम्ही नक्कीच होणार पण गरज आहे त्याला तुम्ही 100%  द्यायची.  अभ्यास म्हणजे अभ्यासच करा, इतर  गोष्टींकडे Distract होऊ नका कारण जीवनामध्ये  Distraction (Social Media, Negative Thoughts and Peoples, etc) खुप आहेत. त्यांपासुन जितका लांब राहता येईल तितक लांबच रहा. सध्या आपल लक्ष आपल्या ध्येयाकडेच असले पाहिजे. आपला एकच ध्यास असला पाहिजे आणि  तो फक्त अभ्यास हा मंत्र उराशी बाळगा .
          आता मी मुख्य विषयाकडे येतो जे आपले नवीन मित्र आहेत ज्यांना MPSC, स्पर्धा परीक्षेचाअभ्यास सुरु करायचा आहे किंवा त्यांनी काही दिवस अगोदर अभ्यास सुरु केलेला असेल त्यांच्या मनात काही प्रश्न असतील,  MPSC अभ्यास सुरु कसा करावा ? अभ्यासक किती तास करावा ? नियोजन कसे करावे? वाचनाची सुरुवात कुठुन करावी ?  पुस्तके कोणते वापरावे ? इत्यादी प्रश्न मनात येत असतील तर त्या सर्व प्रश्नांबाबत मी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे. 
     MPSC, स्पर्धा परीक्षांचा  अभ्यास करतांना आपण सर्व नियोजन करणे , पुस्तक निवडणे, अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिाकांचा अभ्यासक करणे, वाचन करणे, नोटस काढणे , प्रश्नांचा सराव इत्यादी महत्वाच्या गोष्टी याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार  आहोत.

 1.    MPSC परीक्षेचे नियोजन कसे करावे ?
          तर मित्रांनो सर्वप्रथम आणि अत्यंत महत्वाची पायरी अशी येते ती  नियोजनाची,  आपण कोणत्या पदाची परिक्षा देणार आहात, तुम्ही पुर्ण वेळ अभ्यास करणार की, जॉब करत अभ्यास करणार,  किती तास अभ्यासाला देणार आहात. याबाबत सविस्तर व काळजी पुर्वक नियोजन करुन घ्या. 
        मित्रांनो शक्यतो एकच पद ठरवा अनेक मित्र 2 ते 3 पद ठरवतात त्यामुळे अचानक परीक्षा जवळ आली मग आपला गोंधळ उडतो तस होऊ नये म्हणुन एकच पद  एकच ध्येय आणि तेच मिळवण्यासाठी प्रयत्न करा.  आता काहीजण म्हणत असतील की, सर आम्ही एकलय की, दररोज 10 ते 15 अभ्यास केल्यावरच अधिकारी होता येते हे खरे आहे का?  तर मित्रांनो प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाची क्षमता पण वेगळी आहे. त्यामुळे आपली क्षमता किती आहे आपण दिवसांतुन किती तास अभ्यास करु शकतो याबाबत स्वत:च निरिक्षण व अभ्यास करा व नंतर ठरवा तुम्ही किती तास अभ्यासक कराल. इथ एक लक्षात ठेवा मित्रांनो  अभ्यास किती तास केला यापेक्षा किती चांगला व गुणात्मक केला हे महत्वच आहे. 
      जर आपण पुर्ण वेळ अभ्यास करणार असाल तर 8 ते 10 तास व  जॉब करुन अभ्यास करत असाल तर 5 ते 6 तास मन लावुन जरी अभ्यास केला तरी तुम्ही अधिकारी बनु शकता फक्त सकारात्मक रहा आणि नियमित पणे अभ्यास करत करत रहा. पुस्तक संपवण्यावर लक्ष न देता संकल्पना समजुन घेण्यावर भर द्या. संपुर्ण दिवसाचे 3 भाग करा, सकाळी ( 5 ते 12) , (दुपार 12 ते 5) आणि संध्याकाळ (5 ते 10) अशे भाग करुन त्यामध्ये आपण कोणत्या विषयाला किती तास देणार हे ठरवा. तुम्ही जर वरील प्रमाणे भाग केले तर तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करतांना सोप जाईल आणि सहज तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणार.

2.   अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे .
          आता सर्वात महत्वाच टप्पा आहे  तुम्ही पुस्तकांचे वाचन सुरु करण्या अगोदर प्रथम आपण  आपल्या संकेस्थळावर MPSC प्रश्नपत्रिाका व अभ्यासक्रमाच्या दिलेल्या लिंकवर जाऊन  ती लिंक तुम्हांला अधिकृत MPSC संकेतस्थळावर घेऊन जाईल तिथुन तुम्हांला ज्या पदाची मागील प्रश्नपत्रिका व तसेच ज्या पदाचे अभ्यासक्रमाची प्रत पाहिजे ती काढून घ्या अथवा पीडीएफ डावुनलोड करुन घ्या  त्याचा निट अभ्यास करा. ज्यामुळे आपल्याला वाचन करतांना जे अभ्यासक्रमात दिलेल आहेत तेच Topics  अभ्यासायचे आहे हे कळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला कमी पुस्तक जास्त वेळा वाचयच आहे. त्यामुळे अभ्यासक्रम आणि आपल अभ्यास एकाच वाटेवर असल पाहिजे.
          अभ्यासक्रमाच्या बाहेरच वाचयच नाही. अभ्यासक्रम जितका महत्वाच आहे तितकच महत्वाच आहे प्रश्नांच स्वरुप समजुन घेण आणि ते आपल्याला कधी कळेल ज्यावेळस आपण मागील झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचा काळजीपुर्वक अभ्यास करु फक्त वाचन करायच आहे सोडवत बसायचे नाही काहीजण लगेच प्रश्नपत्रिका घेऊन बसता सोडवत, पण तस करु नका मित्रांनो आपण फक् प्रश्नांच स्वरुप कस आहे तो कोणत्या टॉपीकमधुन आलेला आहे हे बघायच आहे.
      त्यामुळे  आपण ज्यावेळेस पुस्तकांचे वाचन करुन त्यावेळेस त्याचा सर्वात जास्त फायदा होतो. तसेच जर आपण बाजारात उपलब्ध असलेल  प्रश्नपत्रिकांचा संच सुध्दा विकत घेऊन शकता चांगल्या चांगल्या प्रकाशनाचे  19, 000 प्रश्न असलेले प्रश्नसंच बाजारात उलब्ध आहेत. त्या प्रश्नसंचात टॉपीकवाईस प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे त्याचा फायदा पण तुम्हाला होतो.

3.   कोणते पुस्तक निवडावे आणि  सुरुवात कशी करावी ?
          मित्रांनो आता  महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पुस्तके कोणती वापरायची याबाबत मी तुम्हांला इथ एक सांगेल की, ज्या विद्यार्थ्यांनी आताच अभ्यास सुरु केले त्यांनी सर्व प्रथम स्टेट बोर्ड  ( 5 वी ते 10वी) च्या पुस्तकांपासुन सुरुवात करावी ज्यामुळे त्याच बेसिक अभ्यासक्रम पुर्ण होईल व त्यांनतर त्यांनी बाजारातील प्रसिध्द असलेली  संदर्भ पुस्तके खरेदी करावी. पण  प्रथम स्टेट बोर्ड पुर्ण करावे. कारण मागील  2 ते 3 वर्षापासुन MPSC स्टेट बोर्ड मधुन प्रश्न विचारण्यास भर देत आहे. त्यामुळे स्टेट बोर्ड + संदर्भ ग्रंथ असा  व रोज प्रश्न सराव याप्रमाणे क्रम लावुन अभ्यास करावा.
          तसेच मित्रांनो मी काही दिवसांनी पुढील ब्लॉगमध्ये बाजरातील प्रसिध्द व जे संदर्भ ग्रंथ वाचुन महाराष्ट्रातील विद्यार्थी अधिकारी होत आहेत. त्या ग्रंथांची यादी सुध्दा प्रसिध्द करणार आहेच.

4.   वाचन किती वेळेस कसे करावे ?
“वाचाल तरच वाचाल”
          मित्रांनो  मला काही मुल म्हणत होते की, सर आम्ही वाचलेल लक्षात राहत नाही, दुस-या मुलांना लगेच लक्षात राहत आम्हांला का लक्षात राहत नसेल.  तर मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची क्षमता वेगळी असते तशीच आकलन शक्ति पण वेगळी असते. जर एखाद्या मुलाला एकदा वाचल्यावर लक्षात राहत असेल तर , दुसऱ्या मुलांला दोनदा वाचल्यावर लक्षात राहते तर, तिसऱ्या मुलाला तिसऱ्यांदा वाचल्यावर लक्षात राहते  तर काही जण अशे असतात की त्यांना वाचुन-लिहुन लक्षात राहत अशाप्रकारे प्रत्यकाची आकलन क्षमता वेगळी असते त्यामुळे सर्वप्रथम आपली आकलन क्षमता किती आहे याचा अभ्यास करा व नंतर आपण किती वेळेस वाचन केल्यावर लक्षात राहत हे तुम्हाला कळेल.व त्यानुसार वाचन करा. त्याचा तुम्हांला नक्कीच फायदा होईल.

5.   नोटस् कशे काढावे किंवा कितव्या वाचनात काढावे ?
          मित्रांनो प्रश्न आहे की, नोट शा आणि कधी काढायच्या  ?  तर मित्रांनो शक्यतो पहिल्यांदा वाचन करतांना व दुस-यांदा वाचन करतांना नोटस् काढु नका ज्यावेळेस तुम्ही तिस-यांदा वाचन कराल त्यावेळेस नोटस काढा ज्यामुळे  तुम्हांला महत्वाचे घटक कळतील आता महत्वाचे घटक कोणते हे तुम्हांला कधी कळेल ज्यावेळे तुम्ही अभ्यासक्रम व मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास व वाचन निट केले असेल.
           तर तुम्ही वाचन करुन काढलेले नोटस्‍ जास्त लक्षात राहतात. वाचन करतांना मन लावुन व एकाग्रतेने वाचन करुन संकल्पना समजुन घेऊन करा, ज्यामुळे तुमच्या जास्त  लक्षात  राहिल. एक लक्षात ठेवा किती पुस्तक संपवले यापेक्षा तुम्हांला त्या पुस्तकांमधील  किती समजल  हे महत्वाच आहे. एका वाचनात कळाल नसेल दुस-यांदा वाचा, दुसऱ्या वाचनात नसेल कळाल तर तिसऱ्यांदा वाचा पण जोपर्यंत तुम्हांला कळत नाही किंवा संकल्पना समजत नाही तोपर्यंत वाचा.

6.   प्रश्नांचा सराव कधी करावा ?
Practice Make a Perfect
          अत्यंत  महत्वाचा आणि शेवटचा टप्पा म्हणजे प्रश्नांचा सराव आहे जर तुमचा अभ्यास चांगला झाला, पण तुम्ही प्रश्नांचा सरावच करत नसाल तर तुम्हांला परीक्षेमध्ये अपयश येऊ शकते. जर तुम्ही प्रश्नांचा सराव केला नाही तर तुम्हांला कळणार कस की, तुम्हांला वेळ किती लागतो,  तुम्हांला कोणता टॉपीक पुन्हा वाचन्याची आवश्यकता अजुन आहे.
          त्यामुळे प्रश्नांचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. मला वाटत की, ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपीक वाचाल जस की, राज्यघटना, मधील राज्यपाल टॉपीक तोह टॉपीक संपला की, त्याच दिवशी त्यावर प्रश्न सोडवा व प्रश्न तयार करा ज्यामुळे तोह टॉपीक त्याच दिवशी पुर्ण समजेल. अशाच प्रकारे सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. रोज प्रश्नांचा सराव झालाच पाहिजे ज्यामुळे तुम्हांला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवतांना प्रश्न पण कळेल आणि तोह कोणत्या टॉपीक मधला आहे लगेच कळेल व तो प्रश्न सहज तुम्ही सोडवू शकाल.
          तसेच परीक्षेच्या 2 महिन्या आधी एखादी टेस्ट सिरीज जोईन करा त्याचा तुम्हांला फायदा असा की, परीक्षमेध्ये वेळेत प्रश्न कशे सोडवायचे हे कळेल. व तुम्हांला किती वेळ लागतो आहे  प्रश्न सोडवतांना कोण-कोणत्या अडचणी येत आहेत हे पण कळेल.
          तर मित्रांनो आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या  अभ्यास नियमित करा, सकारात्मक  रहा, नकारात्मक विचारांपासुन व लोकांपासुन लांब रहा, अफवांकडे लक्ष देऊ नका आपल्याला फक्त 1 जागा पाहिजे जाहिरात निघाल्यावर, त्यामुळे फक्त प्रयत्न 100 % द्या. आपण जर अपयशी झालो म्हणजे आपण प्रयत्न करण्यात कुठेतरी चुकलो असे समजा मागील झालेल्या चुकांचा अभ्यास करुन त्यांना सुधारा व पुन्हा प्रयत्न करणे हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. 
        
         तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती  दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट करा आणि नक्की मित्रांना सांगा.  तुम्हांला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..
मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..





No comments:

Post a Comment