5 योगासन... रोगमुक्त जीवनाकडे ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Sunday, May 31, 2020

5 योगासन... रोगमुक्त जीवनाकडे ?


5 योगासन... रोगमुक्त जीवनाकडे ?

     तर मित्रांनो आज आपण योगसनाची माहिती अभ्यासणार आहोत. संपुर्ण जगामध्ये कोरोना या आजाराने थैमान घातलेले आहे. सर्व जगामध्ये कोरोनावर लस शोधण्याचे कार्य युध्द पातळीवर करत आहे. तसेच कोरोना संसर्ग पसरु नये म्हणुन प्रत्येक देश आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता खाजगी कंपन्या असो कि, शासकीय कार्यालय त्यांना शक्यतो Work From Home  पर्याय सुरु केला आहे.  जास्तीत जास्त लोक आता घरुन काम करणार आहेत. त्यामुळे आता त्यांची शारिरीक हालचाल सुध्दा कमी होणार आहे. शारिरीक हालचाल कमी झाल्याने आता वेगवेगळे आजार बळकावण्याची शक्यता जास्त  वाढलेली आहे, जसे पचन क्रिया बिघडु शकते व  वजन  वेगाने वाढु शकते,  जर वजन वाढले तर त्यामुळे मधुमेह,थायरॉयड, कॅलेस्ट्रोल असे अनेक आजार वाढू शकतात तर या सर्व आजारांपासुन वाचण्यासाठी आपल्याला  रोजच्या जीवनशैलीमध्ये आता बद्दल करावा लागेल. आपल्या आहारामध्ये सकस आहाराचा समावेश करावा लागेल. तसेच रोज सकाळी काही व्यायाम व योगासन आता अनिवार्यपणे करावेच लागेल तरच आपण  रोगमुक्त व सदृढ जीवन जगु शकतो.  तर मित्रांनो आज आपण काही योगासनाची माहिती घेणार आहोत. ज्यामुळे आपले मानसिक व शारिरीक स्वास्थ्य सदृढ राहिल. सदरील योगासन वजन कमी करण्यास, ॲसिडीटी व कफ कमी करण्यास , श्वसनाचे विकार इत्यादी आजार  कमी करण्यास मदत करतील किंवा होणारच नाही. खालील आसन सुरु करण्याआधी  5 ते 10 मिनिट वार्मअप करुन घ्यावे.
रोज  भस्त्रिकासन, कपालभाती, अनुलोम-विनुलोम, भ्रामरी, मंडुकासन रोज 30 मिनिट केल्याने  वजन कमी करण्यास, ॲसिडीटी कमी करण्यास , श्वसनाचे विकार, किडनीचे विकार, डोळयाचे विकार, पाठीचे विकार, कंबरदुखी, मानदुखी, निद्रा विकार असे अनेक रोग या 5 आसनाने कमी होण्यास मदत मिळते किंवा आपल्याला होणारच नाही व आपले मानसिक व शारिरीक स्वास्थ्य सदृढ राहते. सदरील योगासन हे खुप सोपे आहेत कोणतीही व्यक्ति हे आसन सहज करुन शकते.
जर आपण रोज आपल्या दैनदिन वेळेमधुन रोज 30 मिनिट जर आपण शरिरासाठी व मनासाठी दिले तर आपला संपुर्ण दिवस आनंदी व उत्साहवर्धक राहतो. तसेच रोज सकाळी गरम किंवा कोमट पाण्यात मध टाकुन पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते, रोज सकाळी लसणाच्या दोन कळ्यांचे सेवन केल्यास आपल्या पोटाचे विकार कमी करण्यास मदत मिळते अशे अनेक घरगुती आयुर्वेदिक उपचार आहेत जे आपण रोज आपल्या दैनदिन जीवनात त्याचा समावेश करु शकतो ज्यामुळे आपण  निरोगी राहू शकतो.
सदरची माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे जर आपल्या काही जुना आजार असेल तर आपण डॉक्टारांचा सल्ला घेऊन सुरुवात करावी.
करा योग… रहा निरोग….
तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती  दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट करा आणि नक्की मित्रांना सांगा. 
मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..










No comments:

Post a Comment