रोग प्रतिकार शक्ति म्हणजे काय आणि ती कशी वाढवावी ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Tuesday, May 26, 2020

रोग प्रतिकार शक्ति म्हणजे काय आणि ती कशी वाढवावी ?

रोग प्रतिकार शक्ति म्हणजे काय आणि ती कशी वाढवावी  ?


मित्रानों सध्या कोरोना या महामारीने संपुर्ण जगामध्ये थैमान घातलेल आहे. तसेच सर्व देश कोरोनाची लस तयार करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करत आहेत. पण जो पर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत काय उपाय तर  लोकांना स्वच्छतेबाबत, व प्रतिकार शक्ति वाढविण्याबाबत जनजागृती करण्याचे कार्य सध्या शासकीय यंत्रणा खुप मोठया प्रमाणावर करत आहे. तसेच रोग प्रतिकार शक्त्‍िा वाढवी म्हणुन आयुर्वेदिक व वैदयकिय दोन्ही क्षेत्रामध्ये औषध शोधण्याचे काम शासकीय यंत्रणा करत आहे. त्यामुळे आता  आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक गाढा हा सुध्दा उपाय सुचवलेला आहे ज्यामुळे कमीत कमी लोकांची रोग प्रतिकार शक्ति वाढेल आणि लोकांनी  तोह उपाय स्विकारलेला आहे. कारण आता प्रत्येकजण आपली प्रतिकार शक्ति कशी वाढेल याबाबत जास्त लक्ष देत आहे. तर आता काही लोकांना प्रश्न पडला असेल प्रतिकार शक्ति म्हणजे काय आणि ती कशी वाढवता येते  याबाबत आपण येथे थोडक्यात माहिती घेणार आहोत.
रोग प्रतिकार शक्ति म्हणजे काय ?
    थोडक्यात सांगायचे झाले तर सर्व मानवाला निसर्गाकडुन जन्मत:  भौतिक वातावरणातील हानिकारक विषाणुंशी लढण्यासाठी किंवा त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी जी शक्ति मिळते तीला रोग प्रतिकार शक्ति असे म्हणतात.
काही लोकांची रोग प्रतिकार शक्ति जन्मत:च कमी असते तर कोणाची जास्त असते. आजच्या बिघडलेल्या जीवन शैलीमुळे व आहारात झालेल्या बदलामुळे लोकांची प्रतिकार शक्ति कमी होत आहेत. ज्यांची रोग प्रतिकार शक्ति कमी असते ते वारंवार आजारी पडतात आणित ज्या लोकांची रोग प्रतिकार शक्ति जास्त असते ते लोक कमी किंवा लवकर आजारी पडत नाही. 
        ज्यांची रोग प्रतिकार शक्ति कमी असते त्यांना वारंवार सर्दी व खोकला, ताप,  इ. सारखे आजार होत असतात. त्यामुळे जर आपली रोग प्रतिकार शक्ति चांगली असली तर आपण अनेक आजारापासुन वाचु शकतो. आता आपण  आपली रोग प्रतिकार शक्ति कशी कार्य करते याबाबत माहिती घेऊ, जेव्हाण आपण वातावरणात श्वास घेतो, किंवा एखाद्या दुषित वातावरण जातोत त्यावेळेस तेथील दुषित हवा आपल्या शरीरात जाते इथे लक्षात घ्या की, जर आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ति जी आहे ती शरीरात हवेद्‌वारे गेलेले विषाणुंना मारुन टाकणे किंवा त्यांना निष्क्रिय करणे हे आपल्या रोग प्रतिकार शक्तिचे प्रमुख कार्य आहे. 
       पण जर आपली रोग प्रतिकार शक्ति कमजोर असेल तर ते विषाणु आपल्या रोग प्रतिकार संस्थेवर आक्रमण करुन शरीरावर ताबा मिळवतात व आपण आजारी पडतो. पण ज्यावेळेस आपण योग्य आहार (किंवा औषध) घेतो म्हणजे रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत करणारे आहार घेतो त्यावेळेस आपण हळुहळु बरे होत जातोत.
आपल्या घरातील दैनदिन आहारातील व सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक घटक
1.हळद- Curcuma longa
          आपल्या आयुर्वेदामध्ये हळदीचे महत्व फार प्राचीन काळापासुन हळद आरोग्य आणि त्वचेसाठी खुप लाभदायक आहे हे सगळयांनाच माहित आहे. एक उदाहरण म्हणजे जेव्हा एखादी जखम होते त्यावेळेस आपण सर्वात अगोदर हळदीचा वापर करतो. हळदीमध्ये विषाणु संक्रमण न होऊ देणारे औषधी गुणधर्म सुध्दा आहेत. तसेच हळदीचा वापर रक्त प्रवाह शुध्द करण्यासाठी, पचन क्रिया सुधारण्यासाठी, कॅलोस्ट्र्रोल कमी करण्यास इत्यादीसाठी सुध्दा उपयोग होतो. 
          हळदीच्या दुधामध्ये हळद हा प्रमुख घटक असतो. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक घटक आढळतो करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. संशोधनानुसार आपल्या आहारात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते. म्हणुन रोज रात्री झोपण्या अगोदर  हळदी दुध  पिल्यामुळे सर्दी,खोकला होत नाही व कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे हळद  अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. त्यामुळे आपण हळदीचा उपयोग रोज करावा.
2.लसुन Allium sativum
      अस म्हणतात, रोज सकाळी उपाशीपोटी सकाळी लसुण खाल्याणे माणुस निरोगी राहतो. लसुन किटकनाशक म्हणुन सुध्दा प्रसिध्द आहे. तसेच लसुन खाल्याने रक्ताभिसरण संस्था सुरळीत राहते, रक्ताच्या गाठया होत नाही, ॲसिडीटीचा त्रास दुर होतो, तसेच ताण-तणाव, कॅलोस्ट्र्रोल कमी करण्यासाठी सुध्दा मदत होते.
        त्यामुळे  आपण  रोज सकाळी 2 लसुन पाकळीचे सेवन उपाशी पोटी करायला पाहिजे आपल्या आहारमध्ये नियमितपणे केला पाहिजे.  ज्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत मिळते व आपण निरोगी राहतो.
3. कांदा- Allium cepa
जसे आपण हळद आणि लसुण याचे फायदे पाहिले तसेच कांद्याचे पण आहेत. कांद्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहे.रक्त शुध्द करणे, ॲसिडीटीचा त्रास दुर करणे, संक्रमणांशी लढणे, कॅलेस्ट्रोल कमी करणे, उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.कांद्यामध्ये  गंधक, साखर, कॅल्शियम, फॉस्फोरिक आम्ल, लिग्निन, अल्ब्युमीन आणि अ, ब, क गटातील जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे कांदा रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास उपयुक्त आहे आणि आपण कांद्याचे कच्चे व भाज्यामध्ये वापर रोज करायला पाहिजे.
4.आल/अद्रक ( Zingiber officinale)
        आल/ अद्रक  व त्याच्या रसामध्ये  खुप मोठे आयुर्वेदिक गुण आहेत. आले किंवा त्याच्या रसाचे सेवन केल्यास सर्दी व खोकला, ॲसिडीटी कमी करण्यास मदत होते. आल्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे दररोजच्या आहारामध्ये आल्याचा समावेश मुबलक प्रमाणात करावयलाच हवे ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ति वाढते व छोट छोटे आजार आपल्याला लवकर होत नाही.
4.आयुर्वेदिक गाढा
        सध्या आयुष मंत्रालयने आयुर्वेदिक गाढा कसा तयार करायचा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे तसेच आरोग्य सेतु ॲपमध्ये सुध्दा त्याची माहिती दिलेली. आयुर्वेदिक  गाढयाचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत मिळते व सर्दी,खोकला, व इतर छोटे आजार बरे होण्यास लवकर मदत मिळते त्यामुळे तुम्ही सुध्दा आयुर्वेदिक गाढा पिऊन आपले रोग प्रतिकार शक्ति वाढवु शकता.
5. काळा चहा/ डिकाशन
       आपल्याकडे प्राचीन काळापासुन चहा चे सेवन केले  जाते तसेच त्यापासुन मोठया प्रमाणात एनर्जी सुध्दा मिळते. एक चांगली गोष्ट म्हणजे गरीब असो कि, श्रीमंत सर्व घरात चहा मिळतो. आपण एक सवय म्हणुन जरी म्हणुन पीत असलो तरी त्याचे आरोग्यला वेगवगळया प्रकारे फायदयाचे आहे. 
        काळा चहा किंवा डिकाशन चे फायदे आता लोकांना कळाले आहे आणि त्याची मागणी सुध्दा होटेल मध्ये वाढलेली आहे. काळा चहा दिवसातुन 1 ते 2 वेळेस घेणे शरीरीरासाठी चांगले आहे. तसेच काळा चहा मध्ये लिंबू टाकुन पिल्याने पोटाचे विकार , लुज मोशन, इ. कमी होण्यास मदत मिळते., काळा चहा मेंदू, पंचनक्रिया, वजन कमी करण्यासाठी सुध्दा लाभदायक दिसून आले आहे. (काळ्या चहामध्ये आल टाकून पिल्याने सर्दी कमी होण्यास मदत मिळते.)
6. फळे व भाज्या
          आज आपल्या जर रोग प्रकिार शक्त्‍िा वाढवायची असेल तर आपल्या आहार वेळेवर व सकस असले पाहिजे तरच आपली रोग प्रतिकार शक्ति वाढेल व तसेच आपल्याला फास्टफुड, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावे लागतील  याला पर्याय नाही. कारण पचनक्रिया जर चांगली असली तर आपण खाल्लेले अन्न चांगल्या प्रकारे पचेल आणि अन्न पचल्यावर आपल्याला त्यामधुन  सर्व विटामिन्स, प्राटिन्स आणि कार्बोदके मिळतील त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यास मदत  मिळेल.
7. योगासन आणि व्यायाम
      मित्रानों सध्या धावपळीच जग आहे कोणाकडे पण वेळ नाही प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्थ आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही इतरांना वेळ देत नाही ते चालेल पण स्वत:ला  वेळ द्यावाच लागेल त्यासाठी तुम्हाला रोज किमान 1 तास व्यायाम आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मनासाठी योगासन करावेच लागतील तरच तुम्ही या धावपळीच्या जीवनात सदृढ व  चांगले जिवन जगण्यासाठी  तुम्हाला मदत मिळेल व रोग प्रतिकार शक्ति वाढेल.
8. च्यवनप्राशचे सेवन
      आयुर्वेदामध्ये च्यवनप्राशला खुप महत्व दिलेल आहे. च्यवनप्राश मध्ये आवळ्याला जास्त महत्व दिलेले आहे.कारण आवळा हे विटामिन सी चा खजाना असतो.  च्यवनप्राश रोग प्रतिकार शक्ति तर वाढवतेच पण यासोबत पचनक्रिया सुधारते, ह्दयासाठी लाभदाय आहे, मेंदूसाठी लाभदाय आहे, त्वचेसाठी लाभदायक आहे. जुनाट काही आजार असतील त्याना सुध्दा कमी करण्यासाठी लाभदायक आहे. श्वसनप्रणालीसाठी लाभदायक आहे. च्यवनप्राश मध्ये 36 प्रकारचे जडीबुटींचा वापर केला जातो जे आपल्या आरोग्यसाठी बहुउपयोगी ठरतात. च्यवनप्राशचे रोज सकाळी  सेवन करणे आरोग्यासाठी जास्त लाभदाय ठरते.
        च्यवनप्राश हे वेगवेगळया कंपनी आहेत आपल्या आवडीनुसार आपण खेरदी करु शकता
(मधुमेह असलेल्यांनी डॉक्टर च्या सल्याने च्यवनप्राशचे सेवन करावे)
           तर मित्रांनो वरील काही उपाय आहेत जे आपल्याला रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत करतील. वरील जे घटक आहे जसे हळद, कांदा, लसुण, आले, काळा चहा हे गरीब असो कि श्रीमंत दोघाना पण आपल्या आहारात समावेश करता येते  कारण दैनदिन जीवनातील घटक आहेत आता फक्त आपल्या हे आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश करायची गरज आहे.
तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती  दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर नक्की मित्रांना सांगा.
मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..

 Boost Your                
Immunity Power
 शुगर फ्री








No comments:

Post a Comment