MPSC Revision कोणते पुस्तक घ्यावे ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Wednesday, June 3, 2020

MPSC Revision कोणते पुस्तक घ्यावे ?


MPSC Revision  कोणते पुस्तक घ्यावे ?

          मित्रांनो सर्व जगामध्ये कोरोना कहर सुरु आहे. त्यामुळे संपुर्ण जग ठप्प झालेल आहे.  शाळा,महाविद्यालय, कोचिंग क्लासेस , तसेच Study Lab हे सुध्दा बंद आहे. त्यामुळे जे माझे मित्र नियोजनबध्द अभ्यास पुणे किंवा इतर जिल्हयात करत होत त्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण झाला व कोरोना संसर्ग विचारात घेता अर्ध्यापेक्षा जास्त मुल  आपल्या गावी परतले. पण त्यांनी त्यांचा अभ्यास थांबवला नाही ही गोष्ट प्ररणा देणारी आहे. 
        तसेच विद्यार्थी टेलिग्राम, व्हाटसप, युटयुब या माध्यमाव्दारे सुध्दा अभ्यास मोठ्या प्रमाणावर करत आहे. आज ते एक सर्वात चांगला प्लॅट फार्म आहे  इच्छा तेथे मार्ग म्हणतात ना  तसेच काही  आहे.  अभ्यास आता कोठ पण करता येतो हे सध्या सर्व विद्यार्थ्यांनी दाखवुन दिलेल आहे.  मी एकच म्हणेल की,  तुम्ही प्राणिकपणे अभ्यास करत रहा मित्रांनो तुम्ही नक्की यशस्वी होणार यात काही शंका नाही,  फक्त प्रयत्न थांबवु नका.        
           तर आज आपण एका अशा पुस्तकांबाबत माहिती घेणार आहोत जे तुम्हांला यशस्वी होण्यास मदत करेल,  जे की विद्यार्थ्यांच्या आवडीचे व  महाराष्ट्रातील सर्वात प्रसिध्द आहे.  त्या पुस्तकामध्ये MPSC चा संपुर्ण अभ्यासक्रम पुर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हजारो विद्यार्थी प्रत्येक वर्षी या पुस्तकाचा अभ्यास करतात.  या पुस्तकाची रचना MPSC च्या अभ्यासक्रमानुसार केलेली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचताना कोणते टॉपीक कोणत्या विषयातील आहे हे लगेच कळते.  त्या पुस्तकाच नांव आहे एकनाथ पाटील (उर्फ तात्या) यांचा ठोकळा  या एक पुस्तकामधुन तुम्ही PSI-STI-ASO (ALL IN ONE ) या तिन्ही परीक्षांचा अभ्यास करु शकता.  भरपुर विद्यार्थी या ठोकळ्याचा वापर REVISON  साठी करतात.
        लेखकाबाबत सांगायच झाल तर श्री. एकनाथ पाटील हे माजी विक्रीकर आधिकारी आहेत त्यांनी एमपीएसी अभ्यासक्रमाचा खोलवर अभ्यास केलेला आहे त्यांनी एकुण आतापर्यंत (तात्यांचा ठोकळा )26 आवृत्यांचा लेखन करण्याचा चांगला अनुभव त्यांच्याजवळ आहे. तसेच MPSC ज्या प्रकार टॉपीमधुन प्रश्न विचारते त्याचा अभ्यास करुन त्या सर्व टॉपीकचा समावेश त्यांनी या ठोकळ्यात केलेला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना खुप फायदा होतो. त्यांनी विषय आणि त्यामधील अतिमहत्वाचे टॉपीक यानुसार सर्व विषयाचे लेखन या पुस्तकामध्ये केलेले आहे.
        जर आपण MPSC अभ्यासक्रम पाहिला तर आपण अस सांगू शकत नाही की, हे पुस्तक वाचल की अभ्यासक्रम संपला. मित्रांनो जितका अभ्यास करु तितका कमीच वाटत जातो. पण तात्यांचा ठोकळा या पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमाला एक चौकट मध्ये बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामुळे आपल्याला कळत की, आपण कोणत्या टॉपीकला महत्व दिले पाहिजे  आणि आपण कोणत्या टॉपीकला जास्त महत्व देत आहोत.
        तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती  दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट करा आणि नक्की मित्रांना सांगा. 

मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..



      

No comments:

Post a Comment